48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, आजपासून पुढील तीन दिवस तुफान पावसाची शक्यता

मुंबई : येत्या 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस तूफान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.तर मुंबईत 4-5 जून पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. यामुळे पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मान्सीन वेळेअगोदरच दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या नैऋत्य मोसमी वारे हे दक्षिण कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे.

रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पवासचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड आणि जालना भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या दरम्यान 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गमध्ये 3 ते 4 जून दरम्यान वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं प्रशासनाने जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच या काळात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळं येत्या 2 ते 3 दिवसात तो कर्नाटकात पोहोचण्याचा अंदाज आहे. तर 7 ते 8 जुनपर्यंत मान्सून राज्याच्या प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस राज्यात सक्रिय होईल. त्याप्रमाणे आज 2 जून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर 3/4/5 जूनला राज्यात मध्य महाराष्ट्र अहमदनगर नाशिक संभाजी नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड परभणी जालना जोरदार मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6/7/8 जूनला अरबी समुद्रात देखील एक प्रणाली सक्रिय होईल. तसेच 17/18 जून च्या जवळपास देखिल प्रणाली तयार होणार आहे.


