खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस कोथरूडमध्ये सामाजिक उपक्रमातून साजरा..

शिवसेना कोथरूड विभागप्रमुख उदय भेलके यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन
कोथरूड : शिवसेना नेते, खासदार डॉ.श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त द पूना स्कूल आणि होम फॉर द ब्लाइंड ट्रस्ट (गर्ल )गांधी भवन येथे शिवसेना कोथरूड विधानसभा विभागप्रमुख उदय उत्तमराव भेलके यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी केक कापून डॉ.श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी उदय भेलके, बबन बिबवे, सागर पोरे, राजेश अत्रेकर, गणेश वाटणे, विलास आदमाने, प्रणव मेहेता, साहिल कंधारे उपस्थित होते.
श्रीकांतजी शिंदे हे कायम समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून सामाजिक काम करत असतात. त्यांचा वाढदिवस ही त्याच पद्धतीने साजरा व्हावा यासाठी कोथरूड गांधी भवन येथील अंध मुलींच्या शाळेत उपक्रम राबवल्याचे उदय भेलके यांनी सांगितले.



