वारजेतील प्रश्नांसंदर्भात वारजे विकास कृती समितीची महापालिकेत अधिकाऱ्यांबरोबर बैठक.. विविध मुद्द्यांवर चर्चा..

वारजे : वारजे परिसरात रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर प्रशासनाने मार्ग काढावा व तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी वारजे विकास कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर प्रशासनाची या विषया संदर्भात कृती समितीच्या सदस्यांबाबत महापालिकेत बैठक पार पडली.
वारजे विकास कृती समितीने वारजे परिसरातील वाहतूक प्रश्न सुटला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पुणे महानगरपालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यालयात या विषया संदर्भात सर्व विभागाचे प्रमुखांसह बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आंबेडकर चौक ते गणपती रस्ता दोन्ही बाजू , वारजे गावठाण ते शिंदे पूल , तिरुपती नगर ते डुक्कर खिंड रस्ता, मुंबई बेंगलोर महामार्ग लगतचे दोन्ही बाजूचे सर्विस रस्ते याचे रुंदीकरण करणे आणि रस्ता अतिक्रमण मुक्त करणे याची मागणी करण्यात आली . वारजे परिसरात विविध ठिकाणी दिशादर्शक बोर्ड , सूचनाफलक, नो पार्किंग बोर्ड लावणे, वारजे पोलीस स्टेशन समोरील रस्ता, हायवे चौक, सर्विस रोड आदी अनेक ठिकाणी असलेली बेवारस वाहने याबाबत कार्यवाही करणे, रिक्षा, टेम्पो , सहा आसनी रिक्षा स्टॅन्ड यावर कार्यवाही होणे करणे, खाजगी बसेस थांबे ,वारजे वाहतूक विभागात नवीन वॉर्डन नेमणूक करणे , एनडीए रोडवरील सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरू करणे , सर्विस रोडवरील जागा मालक यांना मोबदला देऊन जागा ताबा घेणे बाबत निर्णय होण्यासाठी कार्यवाही व्हावी आदि प्रमुख बाबींवर चर्चा करण्यात आली तसेच समितीच्या वतीने या सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या बैठकीला माजी उपमहापौर दिलीप बराटे , श्रीकृष्ण बराटे ,शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट , दत्तात्रय चौधरी, सचिन बराटे, दत्ता पाखिरे, विनायक लांबे, वसंत कोळी, सतीश पाटील, पराग ढेणे, भावना पाटील, निवृत्ती येनपुरे आदी उपस्थित होते.


