महाराष्ट्र

खासदार संजय राऊत यांना आज लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची शक्यता

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. संजय राऊत यांच्यावर शुक्रवारी दुपारी अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ह्रदयाविकाराशी संबंधीत उपचार सुरू आहे. आज त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Img 20201114 wa0195

एक वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापनेची हालचाल सुरू होती. तेव्हा संजय राऊत यांनी एकहाती मैदान गाजवत भाजप नेत्यांच्या नाकीनऊ आणले होते. या धावपळीत संजय राऊत यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेव्हा संजय राऊत यांच्यावर लीलावती रूग्णालयातच अँजिओप्लास्टी झाली होती. परंतु, त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. लीलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू हे राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करणार आहे.

आज सायंकाळी संजय राऊत लीलावती रूग्णालयात दाखल होणार असून सुरुवातीला अँजिओग्राफी केली जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारी अँजिओप्लास्टी केली जाईल.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये