पुणे शहर

कोथरूडमध्ये २८, २९ जानेवारीला ‘नामदार चंद्रकांतदादा पाटील चषक’ राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा

खेळाडूंना पाच लाख रुपयांची रोख पारितोषिके

पुणे : भारतीय खेळ नवोदित खेळाडूंमध्ये रुजावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोचावा यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या वतीने नामदार चंद्रकांतदादा पाटील चषक 2023- निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेची मान्यता असलेली ही स्पर्धा पटवर्धन बाग येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोरील मैदानावर दि. 28 आणि 29 जानेवारी रोजी पार पडणार आहे.

या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे सहकार्य लाभणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील संस्थांनी सहभाग नोंदवला असून 700 ते 750 खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवणार आहेत. खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे पोडियम उभारण्यात आले आहे. तसेच खेळाडूंसाठी रहाण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. येणाऱ्या प्रत्येक खेळाडूस वेलकम किट देण्यात येणार आहे. यामध्ये खेळाडूला आवश्यक असणारी बॅग, टी शर्ट, नॅपकिन, पाण्याची बाटली इ. गोष्टी आहेत.
एकूण तीन वयोगटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. एकूण पाच लाख रुपयांची रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

सदर स्पर्धा 14 वर्षाखालील मुले-मुली, 16 वर्षाखालील आणि 16 वर्षांवरील मुली, 18 वर्षांखालील आणि 18 वर्षांवरील मुले या वयोगटामध्ये होणार आहेत. यामध्ये खेळाडू दोरीचा आणि पुरलेला मल्लखांब या साधनांवर आपली स्पर्धा खेळतील.

Fb img 1648963058213

मल्लखांब या खेळाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वरीष्ठ गटासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रकारामध्ये वय वर्षे 30 पासून ते 80 वर्षांच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. वरिष्ठ गटामध्ये होणाऱ्या या स्पर्धांमध्ये महिलांसाठी 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 वर्षांवरील असा वयोगट असेल तर पुरुषांमध्ये 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 वर्षांवरील असे वयोगट असणार आहेत. यामध्ये महिलांसाठी दोरीचा तर पुरुषांसाठी पुरलेला मल्लखांब अशी साधने असतील. वरिष्ठ वयोगटामध्ये अनेक छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, नामवंत प्रशिक्षक, पंच आपल्या खेळाची चुणूक दाखवणार आहेत.

या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पाच लाख रुपयांची रोख पारितोषिक, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता मध्यप्रदेशचे मल्लखांब द्रोणाचार्य पुरस्कार विजेते योगेश मालविय आणि भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव धरम वीर सिंग यांच्या शुभहस्ते होणार आहे.

यावेळी प्रथम पुरुष अर्जुन पुरस्कार विजेते सागर ओव्हाळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगवडे सर, अरुण पाटील सर, एशियन मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष राजीव जालनापूरकर, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र अधिकारी, जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष सचिन पुरोहित, शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीचे सचिव राज तांबोळी, सदस्य चंद्रकांत पवार, छत्रपती पुरस्कार विजेते रवींद्र पेठे, प्रशिक्षक जितेंद्र खरे, अभिजित भोसले, सचिन परदेशी, आकाश तगारे, प्रतिक कोरडे, सानिका नाडगौडा आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती आयोजक शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या संस्थापिका-अध्यक्ष- प्रा.अनुराधा येडके यांनी दिली.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये