क्रीडा

राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत मुलींमध्ये उत्तरप्रदेश तर मुलांमध्ये राजस्थान संघ विजयी..

रोलबॉल ला राजमान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार : चंद्रकांत पाटील

पुणे : pune city पुण्यात जन्म झालेला रोलबॉल हा खेळ आज जगातील 57 देशात खेळला जातो आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशभरातून 24 राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला हे पुणेकरांसाठी गौरवस्पद असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा, आमदार, चंद्रकांत पाटील म्हणाले. ह्या खेळाला राजमान्यता मिळावी यासाठी मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असून लवकरच रोलबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची बैठक आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले .

१९ व्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचा समारोप बालेवाडी स्टेडियम येथे झाला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील आणि पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे, संयोजन समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, डॉ. इंदरप्रकाश नेगी, रोल बॉल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरकांत, खासदार आणि छत्तीसगड रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय बघेल, पुणे जिल्हा अध्यक्ष गजानन थरकुडे,स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया चे सचिव एस. एस. रॉय, उद्योगपती मोतीशेठ सांकला, सनी सांकला, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, यांच्यासह इतर मान्यवर आणि देशभरातून आलेले खेळाडू व 24 प्रदेशाचे पदाधिकारी उपस्थित होते. National Rollball Championship – Uttar Pradesh wins girls and Rajasthan wins boys

विजयी संघ खालीलप्रमाणे……
मुलांच्या गटात राजस्थान संघाने महाराष्ट्र संघाला तर मुलींच्या गटात उत्तर प्रदेश संघाने छत्तीसगड संघाला पराभूत करत भारतीय रोलबॉल संघटना, महाराष्ट्र रोलबॉल संघटना व पुणे जिल्हा रोलबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या १८ व्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत राजस्थान संघाने महाराष्ट्र संघाला ६-२ असे पराभूत करतना स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. मध्यंतराला राजस्थान संघाने ४-२ अशी आघाडी घेतली होती. राजस्थान संघाकडून विजय बारलाने ३ तर विकी सैनीने २ तर हिमांशू लांबाने एक गोल केला. महाराष्ट्र संघाकडून हर्षल घुगे व आदित्य सुतार यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मुलींच्या गटातील अंतिम लढतीत उत्तर प्रदेश संघाने छत्तीसगड संघाला ४-३ पराभूत करताना विजेतेपद पटकावले. मध्यंतराला दोन्ही संघांनी २-२ अशी बरोबरी साधली. पूर्ण वेळेपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे एक्सट्रा टाईममध्ये उत्तर प्रदेश संघाने दोन गोल करत विजेतेपद पटकावले. एक्सट्रा टाईममध्ये छत्तीसगड संघाला केवळ एकच गोल करता आला. उत्तर प्रदेश संघाकडून इशिका गुप्ताने २ तर प्रियांशी केशरवानी व क्रिश्नाक्षी कुमारी यांनी प्रत्येकी एक गोल केला. छत्तीसगड संघाकडून इशा साहू, नम्रता ठाकूर व अंजली नायर यांनी प्रत्येकी एक गोल केला.

तत्पूर्वी, मुलांच्या गटात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये आरएसएसए संघाने गुजरात संघाला ८-४ असे पराभूत केले. मध्यंतराला आरएसएसए संघाने ६-१ अशी आघाडी घेतली होती. आरएसएसए संघाकडून मिहीर सानेने ३ तर मनिष राठोड, साकेत गणेशवाडे, योगेश तायडे, निखील चिंडक, मिहीर गणेशवाडे यांनी प्रत्येकी एक गोल केला. गुजरात संघाकडून अघेरा झंकृतने २ तर सत्यम राडदिया व चेतन दोंडा यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मुलींच्या गटाच्या तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत राजस्थान संघाने महाराष्ट्र संघाला ३-१ असे पराभूत केले. मध्यंतराला राजस्थान संघाने १-० अशी आघाडी घेतली होती. राजस्थान संघाकडून प्रीतीका तारावत, तन्वी भटनागर व जान्हवी इंदोरा यांनी प्रत्येकी एक गोल केला. महाराष्ट्र संघाकडून सुहानी सिंगने एक गोल केला.

Img 20220521 wa0000

अंतिम लढत : मुले
राजस्थान ६ – महाराष्ट्र २
राजस्थान ६ : विजय बारला ३ (०.५५, २.४०, ८.०८ मिनिट), विकी सैनी २ (२३.५०, २७.०८ मिनिट), हिमाशू लांबा १ (१७.५६ मिनिट)
महाराष्ट्र २ : हर्षल घुगे १ (९.१५ मिनिट), आदित्य सुतार १ (१४.०९ मिनिट)
मध्यंतर : राजस्थान ४ – महाराष्ट्र २

मुली :

उत्तर प्रदेश ४ – छत्तीसगड ३
उत्तर प्रदेश ४ : इशिका गुप्ता २ (३०.३०, ३९.३८ मिनिट), प्रियांशी केशरवानी १ (०.३७ मिनिट), क्रिश्नाक्षी कुमारी १ (३.२९ मिनिट)
छत्तीसगड ३ : इशा साहू १ (५.२५ मिनिट), नम्रता ठाकूर १ (२७.२० मिनिट), अंजली नायर १ (३९.१९ मिनिट)
मध्यंतर : उत्तर प्रदेश २ – छत्तीसगड २
एक्सट्रा टाईम : उत्तर प्रदेश २ – छत्तीसगड १

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये