कालीचरण महाराजच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन..

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली कालीचरण महाराजला एक दिवसाची पोलीस कोठडी..
पुणे : महात्मा गांधीजी यांच्याबद्दल अपशब्ध काढणाऱ्या कालीचरण महाराजवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. कालीचरण महाराजला हरज करणार असल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सत्र न्यायालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर कालीचरण महाराजला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनामुळे जिल्हा सत्र न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कालीचरण महाराजच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी युवकचे शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे, ओबीसी अध्यक्ष दिपक जगताप, युवती कार्याध्यक्ष श्रुती गायकवाड, दत्ताभाऊ सागरे, महेश हांडे, उपाध्यक्ष वैभव कोठुळे, विद्यार्थी अध्यक्ष विक्रम जाधव, कार्याध्यक्ष शुभम माताळे, विशाल मोरे, मनीषा कावेडिया, किरण जोशी, स्वप्नील थोरवे, कुणाल गायकवाड, गजानन लोंढे, निलेश रुपटक्के, अविनाश भांड, रोहन पायगुडे, आनंद सागरे, मधुकर भगत, अज्जू शेख, देवा वाल्हेकर, साईराम खेडेकर, केतन कदम, निखिल मालाणी, वैशाली शिंगवी, विवेक भरगुडे उपस्थित होते.







