अर्थजगत

New Labour Laws : नव्या कामगार कायद्यातील ‘या आहेत खास गोष्टी’

पुणे : संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी देशात लवकरच लागू होणाऱ्या नव्या कामगार कायद्यातील (New Labour Laws) तरतुदींविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

Img 20220924 182515 453

नवीन कामगार कायद्यानुसार एक वर्ष काम केल्यानंतरच कर्मचाऱ्याला (Employee) ग्रॅच्युइटीचा हक्क मिळेल. सध्या ग्रॅच्युइटीसाठी किमान ५ वर्षांची सेवा आवश्यक आहे. तर कर्मचार्‍यांनी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास त्यांना ओव्हरटाईम मिळेल. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा कायदा ३१ हून अधिक राज्यांनी स्वीकारला आहे. नवीन तरतुदी लवकरच लागू केल्या जातील.

Fb img 1647413711531

नव्या नियमानुसार आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काम करता येणार नाही. कंपनी आणि कर्मचारी यांच्या संमतीने कर्मचारी आठवड्यातून चार दिवसात ४८ तास काम पूर्ण करू शकतील. उर्वरित दिवस तो रजा घेऊ शकणार आहे. नवीन कर्मचार्‍यांना आता जास्त रजा घेण्यासाठी १८० दिवस काम करावे लागेल. सध्या २४० दिवस काम केल्यानंतर त्यांना दीर्घ रजेचा हक्क मिळतो.

कर्मचाऱ्यांच्या हातात पगार कमी

नवीन नियम लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात पगार कमी असेल.  पण भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटी जास्त असेल. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन दर महिन्याच्या सीटीसी (CTC) पेक्षा ५० टक्के किंवा अधिक असेल.

कामगारांचा मोठा वर्ग कायद्याच्या कक्षेबाहेर?

नव्या कायद्याबाबत इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे म्हणणे आहे की, नवीन कायद्यामुळे कामगारांचा मोठा वर्ग कायद्याच्या कक्षेबाहेर जाईल. यापूर्वी ज्या संस्थेत २० जण काम करत होते, त्यांनाही संरक्षण होते. आता ही संख्या ५० पर्यंत वाढवण्याची तरतूद आहे.

…तोपर्यंत संप करता येणार नाही

नवीन कायद्यानुसार, कोणत्याही मुद्द्यावर युनियन आणि नियोक्ता यांच्यातील वाटाघाटी अयशस्वी झाल्यास त्याची माहिती सरकारला दिली जाईल. त्यानंतर हे प्रकरण न्यायाधिकरणाकडे पाठवले जाईल. तेथे जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कामगारांना संप करता येणार नाही. तो संप बेकायदेशीर मानला जाईल. एवढेच नाही तर सामूहिक रजाही संपाच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहे.

काही राज्यांना आक्षेप

नवीन कामगार संहिता ३१ हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तत्त्वतः स्वीकारला आहे. बहुतेकांनी नियमही बनवले आहेत. मात्र. काही राज्यांनी काही मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले आहेत. त्यासाठी बोलणी सुरू आहेत. नवीन कामगार संहिता कधी लागू केली जाईल याची तारीख निश्चित नाही. परंतु कामगारमंत्रालयाचे म्हणणे आहे की ते लवकरच लागू केले जाईल.

Img 20220610 wa0330

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये