महाराष्ट्र

राज्यात कोरोना निर्बंधाबाबतची नवी नियमावली आज दुपारी होणार जाहीर ; उध्दव ठाकरे यांची टास्क फोर्स सोबत बैठकीत चर्चा

मुंबई : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉननं  सर्वांचीच चिंता वाढवली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या ख्रिसमस तसंच नवीन वर्षानिमित्त नवीन निर्बंध लागण्याची शक्यता आहे. राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं.

या बैठकीत टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात नव्या निर्बंधावर चर्चा करण्यात आली आहे. ख्रिसमस, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन अशावेळी कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीनं बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत आज दुपारी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये