पुणे शहर

पुणे महापालिका निवडणूकीसाठी नव्याने आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर; सप्टेंबर मध्ये निवडणुकीची तयारी?

पुणे : पुणे, मुंबई सह राज्यातील महापालिका निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सप्टेंबर मध्ये महापालिका निवडणूका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखविला आहे. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 29 जुलै रोजी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दि.26 जुलै रोजी याबाबतची सूचना घोषित करण्यात येणार आहे.

31 मे रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीमधील अनुसुचित जाती जमातींचे आरक्षण तसेच रहाणार आहे. पण सर्वसाधारण महिलांचे आणि सर्वसाधारण प्रवर्गात काढण्यात आलेली यादी रद्द बातल ठरवण्यात आली आहे. आणि ओबीसींचे राजकिय आरक्षण सुरक्षित करून नविन आरक्षण सोडत 29 जुलै रोजी काढण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश दिले आहेत. त्या त्या महापालिकेतील आयुक्तांसाठी आरक्षण सोडतीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Img 20220721 wa0133

अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरता जागा राखून ठेवल्यामुळे या आरक्षणात कोणताही बदल होत नसल्यामुळे हे आरक्षण 31 मे 2022 रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार राहील. पण 31 मे रोजी काढण्यात आलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण याद्वारे रद्द करण्यात येत आहे, असं आदेशात नमुद करण्यात आलं आहे. तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.

Img 20220722 wa00116197047400577565279
Screenshot 20220722 1955466728056976992296269
Fb img 1658460294017
Img 20220722 wa0130
Fb img 1658454879405
Img 20220722 wa001428129 1
Fb img 1658425384993

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये