अमळनेर येथे होणार आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साने गुरुजींच्या साधेपणानं आणि सात्विकपणांन करावं : न. म.जोशी

वारजे येथील एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न. म. जोशी यांनी केले विचार व्यक्त
वारजे : pune warje अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अलीकडे उत्साही स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हे स्वरूप चांगलं आहे पण या उत्साहाच्या बरोबरीने निश्चित असे प्रेरणादायी घडले गेले पाहिजे तरच त्या उत्साही कार्यक्रमाचं फलित चागलं आहे असं म्हणता येईल. अमळनेर या साने गुरुजींच्या कर्मभूमीत होत असलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साने गुरुजींच्या साधेपणानं आणि सात्विकपणांन करावं आणि उरलेला पैसा साहित्य संमेलनाच्या महाकोषात जमा करावा. म्हणजे सरकारने पैसे किती देले, दिली की नाही दिले, आणि भविष्यात चिंता भासणार नाही असे विचार जेष्ठ साहित्यिक न. म. जोशी यांनी व्यक्त केले. The upcoming All India Marathi Literary Conference to be held at Amalner should be done with the simplicity and integrity of Sane Guruji: N. M.Joshi
पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती व साहित्यिक कट्टा वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना न. म. जोशी बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, ज्येष्ठ साहित्यिक माधवी वैद्य, संत साहित्याचे अभ्यासक भावार्थ देखणे, अभिनेते माधव अभ्यंकर, विकास दांगट, संमेलनाचे संयोजक , निमंत्रक माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, स्वागताध्यक्ष बाबा धुमाळ, तसेच ज्योत्सना चांदगुडे, डी. के. जोशी, वि. दा. पिंगळे, उपस्थित होते. यावेळी अनिल हिंगे यांना उद्योगरत्न पुरस्कार, प्राध्यापक एस.आर.पाटील यांना समाजरत्न पुरस्कार तर निर्मला कैलास खिलारे यांना महिला साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जोशी म्हणाले, आपली संस्कृती बदलत चालली आहे जुने संदर्भ मागे पडत चालले आहेत आशा काळात जीवनाचं श्रेयस आणि प्रेयस व जीवनमूल्य यांचा निर्धारण करून समाजात उदत्तीकरणाच्या भावना निर्माण करायला हव्यात आणि हे काम अशा प्रकारे साहित्य संमेलन आयोजित करून केलं जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आज मूलभूत गरजांइतकच साहित्य जीवनात महत्वाचं आहे. साहित्य हे दुहेरी आनंद निर्मिती देणार आहे. साहित्य निर्मिती करणाऱ्याला निर्मिती करतानाही आनंद मिळत असतो आणि ही निर्मिती वाचताना किंवा समजून घेताना रसिकलाही आनंद मिळतो.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तीला बसवणं किंवा त्याला निमंत्रित करणे हे चुकीचं नाही कारण राजकारणी सुद्धा रसिक असतो हे यशवंतराव चव्हाण सारख्या माणसाने सिद्ध केलेल आहे. चव्हाण यांनी आपल्या महाराष्ट्राच्या भूमित एक बीज पेरलेल आहे. राजकीय व्यक्तींन राजकारण सोडून संस्कृतिक उदात्तता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा आणि तीच परंपरा चालवणारे काही राजकारणी आज आहेत त्यात दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ या दांपत्याचा उल्लेख करावा लागेल.
वारजे परिसराला सांस्कृतिक रूप देण्याचे काम हे दोघे अनेक वर्ष करत आहेत. माधवी वैद्य आणि विदा पिंगळे डी के जोशी यांच्यासारखी माणसं त्यांच्या पाठीशी आहेत. देशात समाजाची वाळवंटी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात स्वस्ती चिन्हे या संमेलनाच्या रूपाने उमटलेली आहेत त्याबद्दल या दोघांचही अभिनंदन. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात जसा उत्साह असतो त्याच प्रकारचा उत्साह वारजेतील एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनात पाहायला मिळत आहे आणि हे एक आनंदाची गोष्ट असे जोशी म्हणाले.



मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबाबतचे सर्व पुरावे सरकारकडे दिलेले आहेत पण सरकार अभिजात भाषेचा दर्जा मराठीला द्यायला तयार नाही अशी खंत व्यक्त करताना जोशी म्हणाले, मराठी भाषा अभिजात आहे तर ते टिकवण तीच उद्दातीकरण करणं, ती तळागाळापर्यंत नेण्याचं काम अशी साहित्य संमेलन करत असतात.
निर्धार करा माझी स्वाक्षरी देवनागरी
जोशी म्हणाले, मराठी भाषेचं उद्दातीकरण करायचं असेल तर आपण आपली स्वाक्षरी देवनागरीतून करतो का याचा विचार करा. करत नसाल तर देवनागरीतून स्वाक्षरी करायला सुरू करा. आज पासूनच निर्धार करा माझी स्वाक्षरी देवनागरी म्हणून. पुढील काळात सबंध वारजे देवनागरीतून स्वाक्षरी करायला लागलं तर संमेलनाचं फलीत चांगलं झालं असं म्हणता येईल.
यावेळी रुपाली चाकणकर, भावार्थ देखणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दिपाली धुमाळ स्वागतपर भाषण केले तर प्रास्ताविक करताना बाबा धुमाळ यांनी वारजे साहित्य कट्टा व त्यातून सुरू झालेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाची माहिती दिली.
सकाळी प्रथम शिवचरित्रकार धर्मराज महाराज हांडे यांच्या हस्ते राजयोग गणेश मंदिर ते बाएफ संस्था अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते ग्रंथ महोत्सवाचे उदघाटन पार पडले.





