सांस्कृतिक

दुबई मध्ये पारंपारिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या संदेशानुसार सर्वांना संघटित करण्यासाठी यंदा इंस्पायर इवेंट्स यांनी दुबई मधील सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे तसेच मित्रपरिवार यांना एकत्र घेऊन दुबई मधे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले. गणेशोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

या गणेशोत्सवात भव्य असा बारा ज्योतिर्लिंगाची माहिती देणारा देखावा सादर करण्यात आला जो दुबईकरांचे आकर्षण बनला. वेस्टझोन प्लाझा हॉटेल अपार्टमेंट, मनखुल, दुबई येथे दिनांक २७ ऑगस्ट रोजी श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या वादनाने गणपती बाप्पा चे आगमन सोहळा आणि मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिवसभरात भजन, गणेश जाप, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महाआरती करण्यात आली. दुसर्‍या दिवशी २८ ऑगस्ट रोजी भजन, सामूहिक गणेश जाप, तसेच महाआरती करण्यात आली. हजारो भाविकांनी गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

Img 20250830 130224
Img 20250508 wa00018046597267745442111

आखाती देशात पर्यावरणातील पाणी खराब होऊ नये म्हणुन गणपती बाप्पाचे विसर्जन समुद्राच्या पाण्यात करण्यास बंदी आहे, सर्वांनीच दुबई मधील नियमांचे पालन करून यंदा दिड दिवसा नंतर विधिवत पूजा करुन शिस्तबद्ध मिरवणूक काढून दुबई मधील खास विसर्जनाची सोय उपलब्ध केलेल्या फार्म हाऊस मध्ये गणपती बाप्पाला काही चुकले असेल तर माफ कर असे सांगून पुढच्या वर्षी लवकर यायची विनंती करुन भरलेल्या उराने तसेच पाणावलेल्या डोळ्याने निरोप दिला.गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी दुबई संघटनांनी आणि मित्रपरिवारांनी हातभार लावला.

Img 20250829 wa00238200322078335081890
Img 20250829 wa00202976631255753159559
Img 20240404 wa0013282295561886146142642027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये