पुणे शहर
कोथरूड गोसावी समाजाच्या वतीने भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना जाहीर पाठिंबा

कोथरूड : कोथरूड मतदार संघातील गोसावी समाजाचा स्नेह मेळाव अंबर हॉल कोथरूड या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्यामध्ये समस्त गोसावी समाजाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे कोथरूड मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी समाजाचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन उपस्थित समाज बांधवांना दिले.
याप्रसंगी मेळावा समन्वयक भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन बापू चव्हाण , विनोद चव्हाण, गणेश चव्हाण, पुनम चव्हाण, कविता चव्हाण, रोशन चव्हाण, ओंकार चव्हाण यांनी केले होते.










