कोथरूडमध्ये ‘मंदीर स्वच्छता अभियाना’ अंतर्गत मंदिरांची साफसफाई

कोथरूड : कोथरूड मध्ये असणारी देवदेवतांची मंदिरे व परिसरची “मंदीर स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत स्वच्छ्ता करण्यात आली. कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, कमिन्स इंडिया लिमिटेड, जनवाणी सहकारी संस्था, स्वच्छ सहकारी संस्था, सेवा सहयोग व हर्षदिप फांऊन्डेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, हास्य क्लब डहाणूकर शाखा, व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

डहाणूकर कॉलनीतील राममंदिर व गोपीनाथ नगर परिसरातील दत्त मंदिर, कोथरूडचे ग्रामदैवत म्हातोबा मंदिरामध्ये पुणे शहराचे ब्रँन्ड अँम्बेसिडर गायक संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी नगरसेवक शाम देशपांडे यांच्या हस्ते मंदिरातील आतील परिसराची जेटींग मशिनच्या सहाय्याने पाण्याच्या फवाऱ्याने सफाई करण्यात आली. शिवाय पुजा पार्क व प्रभागातील गणपती, म्हसोबा, मारुती, भवानी माता, दुर्गामाता, महादेव, विठ्ठल या विविध देवतांची मंदीरे तसेच मंदीराच्या बाहेरील परिसराची सर्व क्षेत्रातील सन्माननीय लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्वच्छता केली.



सदर स्वच्छता अभियान घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम , विभागीय कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त संतोष वारूळे, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. केतकी घाटगे, महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, गणेश चोंधे, गणेश साठे, रूपाली शेडगे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रमोद चव्हाण, संतोष ताटकर यांच्या निरिक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड,आण्णा ढावरे, साईनाथ तेलंगी, गणेश चव्हाण व सेवक कुणाल जाधव, परेश कुचेकर, प्रविण कांबळे, दत्ता कांबळे, चंद्रकांत धोत्रे, राजू सकट, राहूल लोखंडे, किरण तुसाम,निशांत सकट, कुणाल कांबळ यांनी स्वच्छता अभियान राबविण्यात मेहनत घेतली.



या स्वच्छता मोहिमेत सेवानिवृत्त सफाई सेवक व माजी ब्रँन्ड अँम्बेसिडर गायक महादेव जाधव यांनी स्वच्छतेच्या गायनातून नागरिकांना मंत्रमुग्ध करून मंदीर स्वच्छतेचा संदेश दिला. सदर अभियानात कमिन्स कंपनीचे संपत खैरे, संदीप क्षिरसागर, जनवाणीचे समिर अजगेकर, जयश्री पाटील, स्वच्छ संस्थेचे नितिन मदने, सोहन खिल्लारे, सेवा सहयोगचे युवराज चाबुकस्वार, हर्षदिपच्या कोमल बंड रोटरीचे उपप्रांतपाल किरण इंगळे, रोटरीच्या अध्यक्षा प्रतिभा जगदाळे, जनसेवक बाळू दांडेकर, अमेय कोकाटे, नारायण पाटील व्यापारी संघाचे शशिकांत उभे मनपा सेवक, स्वच्छचे सेवक व नागरिक सहभागी झाले.




































