पुणे शहर

पुण्यात विजेचा शॉक लागून ट्रक चालकाचा होरपळून जागीच मृत्यू

पुणे : विजेच्या फिडर पिलरचा शॉक लागून झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची घटना पुणे-नगर रस्त्यावरील चंदननगर येथे घडली. या घटनेत भगवान तुळशीराम फुलतांबकर (वय 38, रा. दत्तनगर रहाटणी पुणे ) या ट्रक चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

पुणे नगर रस्त्यावरील चंदननगर, 9 बीआरडी येथील 22 केव्ही फिडर पिलरजवळ सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला शॉक लागून ती गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दल व पोलीस यांनी धाव घेऊन तेथील विद्युत प्रवाह बंद केला. जखमी व्यक्तीला अग्निशमन उपकरण सिलिंग हूक व दोरीच्या साह्याने तेथून बाजूला करून उपचारासाठी तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ट्रकचालक भगवान फुलतांबकर हे दोन दिवसापूर्वी गुजरात येथून माल घेऊन पुण्यात आले होते. आज सकाळी घरून निघाल्यावर वाघोली येथे गोडाऊनला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. हा अपघात एवढा भीषण होता की त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळी महावितरण अधिकाऱ्यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. नेमका अपघात कसा झाला हे मात्र समजू शकलेले नाही. या प्रकरणी विमान नगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Fb img 1647413711531 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये