फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने 26 तारखेला रक्तदान शिबिर आणि आयुष्मान भारत योजना अभियानाचे आयोजन

पुणे : फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने राज्यसभा खासदार प्रा.डॉ मेधा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “भव्य रक्तदान शिबिर व आयुष्मान भारत योजना अभियान” रक्तदान करणाऱ्यास फिनिक्स फाउंडेशन तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल. अशी माहिती आयोजिका द फिनिक्स फाउंडेशन पुणे संस्थापक अध्यक्षा यामिनी मठकरी यांनी दिली आहे.
मठकरी म्हणाल्या, आयुष्मान भारत योजनेसाठी वयोमर्यादा -70 वर्षे आणि पुढे. असून यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो. हि आवश्यक कागदपत्रे आहेत.

रक्तदान किवा आयुष्मान कार्ड ज्यांना करायचे आहे, त्यांनी या क्रमांकावर आपली माहिती व्हॉट्सअप करणे व माहिती पाठवताना रक्तदान/आयुष्मान कार्ड हे नमूद करावे सोबत नाव, पत्ता पाठवणे. व्हॉट्सअप नं :- 8805601068 / 8459543944
दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत.स्थळ : सहकार उद्यान, हॉटेल स्वीकार लेन, नळ स्टॉप जवळ, एरंडवणा, पुणे येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती मठकरी यांनी दिली आहे.



















































