नव्या वर्षात खिसा होणार रिकामा ; हे होणार महाग..

मुंबई : नव्या वर्षात जीएसटीमुळे (2022)नागरिकांचे खिसे रिकामे होणार आहेत. कपडे आणि शूज चप्पल खरेदी करण्यापासून ते ऑनलाइन कॅब बुक करणे महागणार आहे. कपडे आणि पादत्राणांवर आता 12% जीएसटी आकारला जाणार आहे.
सरकारने कापड, रेडिमेड आणि पादत्राणांवरील GST 7% ने वाढवला आहे. 1 जानेवारीपासून रेडिमेड कपड्यांवरील जीएसटी दर 5% वरून 12% पर्यंत वाढेल. त्यामुळे रेडिमेड कपड्यांच्या किंमती वाढतील. त्यामुळे नवीन वर्षापासून तयार कपडे घेण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
ऑनलाइन पद्धतीने ऑटो रिक्षा किंवा कॅब बुकिंगवर 5% जीएसटी आकारला जाईल. म्हणजेच ओला, उबेर यांसारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मवरून ऑटो रिक्षा बुक करणे आता महाग होणार आहे. मात्र, ऑफलाइन पद्धतीने ऑटो रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. फूड डिलिव्हरी अॅप्सवरही नवीन वर्षापासून 5% GST लागू होईल.




