महाराष्ट्र

पोलीसांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक : डाॅ.सचिन नागापूरकर

महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने..

आज महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिन. 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिस दल व दलाचा ध्वज फडकविण्यात आला.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद वाक्य असणारे महाराष्ट्र पोलीस दल आपले कर्तव्य अखंड बजावत आहे. परंतु आज पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने  पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत चर्चा होणे गरजेचे असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ सचिन नागापूरकर यांनी म्हंटले आहे.

डॉ. सचिन नागापूरकर म्हणाले की, आज आपण सर्वजण महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिन हा साजरा करतो, परंतू डाॅक्टर म्हणून अस्थीरोग तज्ञ म्हणून काम करत असताना पोलीस दलातील बरेच पोलीस ज्या वेळी उपचार घेण्यासाठी दवाखान्यात येतात तेव्हा नक्कीच पोलीस दलातील कर्मचारी वर्ग ह्याच्या आरोग्याविषयी बोलणे आवश्यक होते.

Img 20240404 wa00142747383113629703933

सतत काम, दहा, बारा, सोळा तास काम म्हणजे कामाच्या वेळेची मर्यादा नाही. या सततच्या कामाच्या ताणामुळे
सांधेदुखीचा आजार बर्‍याच पोलीसांना होताना दिसत आहे.
भारतीय उपचार पद्धती आयुर्वेदानुसार सांधेदुखी हा एक वाताचा आजार आहे. वेळी अवेळी जेवन करणे, बर्‍याच वेळ उपाशी राहणे, जंक फूडचा अती वापर, जागरण, झोप नीट न होणे,  वातूळलूले पदार्थ चे सेवन करणे अशा कारणांमुळे वात प्रकार शरिरात वाढतो परिणामतः सांधेदुखी, कंबरदुखी, मानपाठ,
गुडघेदुखी, पायांवर सूज येणे, हात पायाला मुंग्या येणे अशा प्रकारची दुखणी पोलीस दलातील कर्मचारीवर्गाला होत असल्याचे दिसत आहे.

अतिकाम, ताणतणाव, कधी मोर्चासोबत चालणे, कधी सतत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभे राहणे पहारा, गस्त घालणे, जागरण यामुळे बर्‍याच पोलीस मित्रांना उच्च रक्तदाब…मधूमेह, ह्रदय रोगाचे आजार होताना दिसत आहे. गाऊट सारखा संधीवाताचा आजार पण पोलीसांमध्ये दिसून येतो.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

आज ह्या पोलीस दल स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलीस मित्र सहकारी ह्यांनी आपल्या आरोग्यविषयक काळजी पूर्वक लक्ष केंद्रित करून काम करणे आवश्यक आहे ह्या बाबात नक्कीच विचार केला पाहीजे. सकस आहार, योग्य तो व्यायाम, मानसिक तणावमुक्त जीवन कसे जगता येईल त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  नागापूरकर यांनी म्हंटले आहे.

आपले कोणी फॅमिली डॉक्टर असतील, स्पेशालिस्ट डाॅक्टर मित्र असतील तर आपण पोलीस बांधवांनी  नक्कीच आपले आरोग्य कसे निरोगी राहील ह्या साठी मार्गदर्शन घ्यावे. आपण पोलीस बांधव जे समाज रक्षणाचे काम करत आहात, त्यासाठी मानाचा सलाम तर आहेच पण त्यांचे आरोग्य पण उत्तम रहावे ह्यासाठी पण नक्कीच विचार झाला पाहीजे असे नागापूरकर यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये