पुणे शहर

पाणीपुरवठा आणि कचरा मुक्त कसब्यासाठी अहवाल सादर करून तात्काळ कार्यवाही करा- आमदार हेमंत रासने

पुणे : कसबा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. कचरामुक्त कसबा अभियान तसेच पाणी पुरवठ्याशी संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या सोबतीने काही दिवसांपूर्वी पाहणी करण्यात आली होती. यामध्ये महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भातील अहवाल आठवडाभरात सादर करून तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना यावेळी केली.

मतदारसंघात नियमित व योग्य दाबाने पाणी पुरवठा, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे तसेच गरज असेल तिथे डांबरीकरण, ड्रेनेज, उद्यानांमधील व्यवस्था, विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यासंदर्भात यावेळी निवेदन देण्यात आले. तसेच विविध खाते प्रमुखांची भेट घेत नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या समस्या सोडवण्यासाठी चर्चा केली. यावेळी मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20240404 wa00142747383113629703933
Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये