पुणे शहर

कर्वेनगर मधील वनदेवी वनोद्यान टेकडीवरील साहित्याची दुरावस्था..

कर्वेनगर : कर्वेनगरमधील वनदेवी मंदिरामागे असणाऱ्या टेकडीवर मागील दोन वर्षांपूर्वी वनोद्यान विकसित करण्यात आले. यामध्ये लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य, तसेच टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांकरिता ओपन जिमचे साहित्य देखील बसवण्यात आले होते. या टेकडीवर परिसरातील अनेक नागरिक नियमित चालण्यासाठी तसेच व्यायामासाठी येत असतात त्याचबरोबर लहान मुलेही मुक्तपणे खेळण्यासाठी टेकडीवर येतात.

मात्र, मागील काही दिवांपासून येथील साहित्याची तसेच वनतलावासाठी असणाऱ्या पाण्याच्या पाइपलाइनची देखील तोडफोड झाल्याचे दिसत आहे. या आधीही टेकडीवरील सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची समाजकंटकांकडून रात्रीच्या वेळी तोडफोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. असाच प्रकार या साहित्याबाबत घडला असल्याने वनविभागाचे या टेकडीवरील साहित्याकडे, वनराईकडे तसेच सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजयुमो पुणे शहर उपाध्यक्ष सचिन फोलाने यांनी केला आहे.

यासंदर्भात पुणे वनविभागाचे वनसंरक्षक, राहुल पाटील यांची भेट घेऊन फोलाने यांनी वनोद्यानातील साहित्याच्या दुरावस्थेबाबत निवेदन दिले असून लवकरात लवकर सर्व साहित्याची दुरुस्ती करावी तसेच टेकडीवरील सुरक्षेबाबत योग्य त्या उपायोजना करण्यात याव्यात व तोडफोडीचे प्रकार रोखण्याबाबत वनविभागाने कडक भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये