कोथरुडमध्ये ९९ रुपयांमध्ये वाहन चालविण्याचे लर्निंग लायसन्स ; शिवजयंतीनिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठानचा उपक्रम..

कोथरुड : pune, Kothrud शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या ९९ रुपयांमध्ये टू व्हिलर आणि फोर व्हिलर गाड्यांचे लर्निंग लायसन्स काढून देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमध्ये कोथरूड मधील १५० नागरिकांनी सहभाग घेत लर्निंग लायसन्स काढून घेतले. दरवर्षी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या ९९ रुपयांमध्ये टू व्हिलर आणि फोर व्हिलर गाड्यांचे लर्निंग लायसन्स काढून देण्याचा उपक्रमलाही कोथरुड मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महापौर मुरलीधर मोहोळ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठाननेचे अध्यक्ष – अमित तोरडमल, सूरज वाफगावकर, महेश लाड, ऋषिकेश वायकर, संदीप ढमढेरे, आशिष सांगळे, रोहित तोरडमल व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे संयोजन केले होते.




