प्रशांत जगताप यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर केलेली टीका ही राष्ट्रवादीचे अपयश झाकण्याचा प्रयत्न : खर्डेकर

पुणे : राष्ट्रवादी चे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेली टीका ही स्वतः चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी आणि कोरोना काळातील राष्ट्रवादीचे अपयश झाकण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर केली आहे. Prashant Jagtap’s criticism of Chandrakant Patil is an attempt to cover up the failure of the NCP
जगताप यांनी आज एका मुलाखतीत ज्या पुणेकरांनी चंद्रकांत पाटील यांना विधानसभेवर पाठवले त्या पुणेकरांसाठी त्यांनी काय दिवे लावले, कोरोना काळात काय कामे केली अशी टीका केली होती. त्यावर खर्डेकर यांनी जगताप यांना प्रतिउत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी चे लोकप्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात दिसलेच नाहीत हे पुणेकरांनी बघितले आहे. किंबहुना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर पालक मंत्री महोदयांना जाग आली आणि त्यांनी पुण्यात बैठका घ्यायला सुरुवात केली असा टोला खर्डेकर यांनी लगावला आहे.
खरेतर pandemic च्या काळात सर्व जबाबदारी ही राज्य सरकार ची व प्रशासनाची असते याचा बहुधा त्यांना विसर पडला असावा. भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कोरोना काळातील सेवा कार्य याचे मूल्यमापन घरात बसून केवळ टीका आणि प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाऱ्यांना समजणें अवघड असल्याचे खर्डेकर यांनी म्हंटले आहे.
कर्वे संस्था अथवा एस एन डी टी कॉलेज येथे सुरु झालेल्या विलगीकरण केंद्रातील रुग्ण व सेवकांना चंद्रकांत पाटील वतीने शत प्लससह आरोग्य सुरक्षा किट भेट देणे असो किंवा रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणे असो ते करत असलेले कार्य प्रचंड आहे.
एखाद्या लोकप्रतिनिधी ने स्वतःची टिमकी न वाजवता एवढ्या मोठया प्रमाणावर सेवाकार्य करणे हे सतत राजकारण करणाऱ्यांना समजावून सांगणे अवघडच आहे तरी पण प्रशांत जगताप यांनी एकदा आपली टीम घेऊन यावे आणि एकदा चंद्रकांत पाटील करत असलेले सेवाकार्य स्वतःच्या डोळ्यांनी बघावे / शक्य झाले तर त्यात सहभागी व्हावे. असे आवाहन खर्डेकर यांनी केले आहे.

गत वर्षभरात असे एकही क्षेत्र नाही जेथे चंद्रकांत पाटील यांनी मदतकार्य केले नाही. सोसायट्यामध्ये सॅनिटायझशन, हँडसफ्री सॅनिटायझर स्टँड देणे, गरजूना ज्येष्ठ नागरिकांना घरपोच डबे पोहोचविण्याचा उपक्रम असेल किंवा मोफत Quarantine centre ची उभारणी असेल,अर्सेनिक अलबम चे मोफत वाटप असेल किंवा शिधा वाटप, चंद्रकांतदादांनी कधीच हात आखडता घेतला नसल्याचे खर्डेकर यांनी सांगितले आहे.
आता दुसऱ्या लाटेत तर रक्तदान, प्लाझ्मा दान, रोज शेकडो नागरिकांना समुपदेशन व मोफत औषध पुरवठा, विलगीकरण केंद्राची उभारणी, क्रिकेटपटू हरभजनसिंग यांच्या सहकार्याने RTPCR व Antigen testing साठी ची मोबाईल व्हॅन पुणेकरांसाठी उपलब्ध करतानाच ऑक्सीजन व रेमडिसिवीर च्या सुरळीत पुरवठ्यासाठी प्रयत्न, परदेशातून oxygen concentrator व Ventilator मिळविण्यासाठी थेट पंतप्रधानांशी संपर्क साधून Import duty माफ करून घेत विशेष विमानाने हे साहित्य भारतात यावे यासाठी प्रयत्न यासह Oxygen bed असलेले रुग्णालय उभारणीवर भर दिला आहे.
संजीवनी रुग्णालयासह शहराच्या विविध भागात असे सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची उभारणी करत असताना मनपा तील पदाधिकारी व नगरसेवकांना सूचना देऊन Oxygen Plant उभारण्यावर ते भर देत आहेतच. 10000 बाटल्या रक्तदान आणि किमान 2000 oxygen bed चे target ठेऊन काम करणारे पाटील यांनी शहरातील भाजपा टीम च्या माध्यमातून 6000 बाटल्या रक्तदानासह, 200 जणांचे प्लाझ्मा दान, घडविले आहे, म्हणूनच ते केवळ कोथरूडकरांच्याच नव्हे तर पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहेत.
आत्ता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढलेला असताना रोज 1200 ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळ घरपोच जेवणाचा डबा देण्याचा उपक्रम असेल किंवा रोज 350 लहान मुलांना दूध व बिस्कीटचा पुरवठा सर्व कार्यात ते अग्रेसर आहेत. राज्य सरकारच्या चुकांवर बोट दाखवत असताना दादांचे सेवाकार्य अव्यहातपणे सुरु असल्याचे खर्डेकर यांनी म्हंटले आहे.



