कोथरुड
भाजप कोथरूड विधानसभा मदारसंघाच्या सोशल मिडिया अध्यक्षपदी प्रतिक बंडी यांची निवड

कोथरूड : भारतीय जनता पार्टी कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या सोशल मिडिया अध्यक्ष पदी प्रतिक विजय बंडी यांची निवड करण्यात आली आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
या आधी प्रतीक बंडी यांनी भाजप युवा मोर्चा कोथरूड उपाध्यक्ष व प्रभाग १२ च्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे.

पक्षाने दिलेली कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या सोशल मिडिया अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार असून उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व भाजप प्रदेश सरचिटणीस व पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनानुसार काम करणार असल्याचे प्रतीक बंडी यांनी सांगितले.









