पुणे शहर

पृथ्वीराज मोहोळ ठरला हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा मानकरी..

मुन्ना झुंझुरके व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली अटीतटीची लढत..

पुणे : कर्वेनगरमध्ये  मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मुन्ना झुंझुरके व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारत हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील मानाची गदा पटकावली.

मुन्ना झुंझुरके व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात शेवटच्या सेंकदा पर्यंत लढत रंगली होती. दोघांनाही ७ गुण मिळाल्यानंतर बरोबरी झाली पण पृथ्वीराज मोहोळ याला ढाकेवर मिळालेल्या चार गुणांच्या निर्णयावर विजयी घोषित करण्यात आले आणि मैदानात एकच जल्लोष झाला.

यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून विजेत्याला देण्यात येणारी चांदीची गदा पृथ्वीराज मोहोळ याला माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,  बापू भेगडे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे पदाधिकारी, स्पर्धेचे आयोजक कोथरुड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक विजय खळदकर यांच्या हस्ते बहाल करण्यात आली. यावेळी बाळासाहेब बराटे, शंकर भोरडे, प्रशांत बधे, अविनाश बागवे, माणिक दुधाने, सचिन बराटे, सचिन दोडके, चेतन भालेकर, प्रवीण दुधाने, तेजल दुधाने, आदी उपस्थित होते.

पुणे कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने आणि हवेली तालुका कला क्रीडा निमंत्रित व मैत्रीप्रतिष्ठान आयोजित या कुस्ती स्पर्धेचे आयोजन उत्तमरीत्या केल्याबद्दल आयोजक कोथरुड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक विजय खळदकर यांचे कौतुक करतानाच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महा.चॅम्पियन वैभव तांगडे विरुद्ध राष्ट्रीय विजेता विजय रानवडे यांच्यात घेण्यात आलेला निकाली कुस्ती चा सामना अनिर्णयित राहिला. ३० मिनिटे ही कुस्ती सुरू होती. शेवटी वेळ संपल्याने कुस्ती अनिर्णयित राहिली.

Fb img 1648963058213
Img 20220414 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये