कोथरुड मध्ये अजित करंडक २०२१ स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न

वारकरीभूषण व कलाभूषण पुरस्काराचेही वितरण..
कोथरुड : pune city राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस, व योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष डोख व सामाजिक कार्यकर्त्या दिपाली डोख यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अजित करंडक २०२१ स्पर्धेतील विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व किर्तनकेसरी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. Prize distribution of Ajit Trophy 2021 held in Kothrud
यावेळी युवा कीर्तनकार ह.भ.प. चैतन्यमहाराज वाडेकर यांना वारकरीभूषण २०२१ व तबलावादक गोपाळ धुमाळ यांना कलाभूषण पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सांप्रदाय क्षेत्रातील ह.भ.प. मारूती महाराज कोकाटे, ह.भ.प. संतोष महाराज सुर्वे, ह.भ.प. यशवंत महाराज फाले, ह.भ.प. ऋतिका कदम आदी उपस्थित होते.
तसेच लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष विजय डाकले, महेश हांडे, विनायक हनमघर, माणिक दुधाने, सिताराम तोंडे पाटील, ज्योती सूर्यवंशी आदी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

विजेत्या स्पर्धकांची नावे
गट क्र. १
प्रथम क्रमांक – ओंकार निलेश घटे (गायन)
द्वितीय क्रमांक – अंकित अतुल शेडगे (नृत्य)
गट क्र. २
प्रथम क्रमांक – योगिनी रोहिदास भरेकर (गायन)
द्वितीय क्रमांक – नैतिक नंदकुमार मोहकर (पोवाडा)
तृतीय क्रमांक – जयंत दिगंबर चव्हाण (मिमिक्री)
गट क्र. ३
प्रथम क्रमांक – अभिषेक अंकुश कानगुडे (तबला)
द्वितीय क्रमांक – क्षितीज बाळासाहेब क्षीरसागर (पोवाडा)
तृतीय क्रमांक – वैष्णवी संदेश पानकर (नृत्य)
गट क्र. ४
प्रथम क्रमांक – सेजल बळिराम धर्से (स्केच)
द्वितीय क्रमांक – अविष्कार अनिल शिंदे (तबला)
तृतीय क्रमांक – सेमल सुरेश गिजे (नृत्य)



