चंद्रकांत मोकाटे यांना कर्वेनगर ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा.. एकमुखाने पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थ एकवटले..

चंद्रकांत मोकाटे धनशक्ती विरुध्द लढणारा मावळा – कर्वेनगर ग्रामस्थ
कर्वेनगर : कोथरूड मतदार संघातील महाविकास आघाडी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांना कर्वेनगर ग्रामस्थांनी आज जाहीर पाठिंबा दिला. हा पाठिंबा देण्यासाठी सर्व ग्रामस्थ कर्वेनगरमधील भैरवनाथ मंदिरात एकवटले होते. आपल्याला सहज भेटता येणारा, आवाज दिला तरी आपल्या पाठीशी उभा राहणारा, आपल्या सुख दुःखात येणारा, आणि कोथरूड, कर्वेनगरच्या विकासाला दिशा देणाऱ्या चंद्रकांत मोकाटे यांना पाठीशी उभे राहण्याचा आणि त्यांना निवडून आणण्याचा निर्धार आजच्या मेळाव्यात करण्यात आला.
यावेळी कांता बराटे, बाळासाहेब बराटे, कुमार बराटे, पोपट फेंगसे, शिवाजी फेंगसे, शिवाजी बराटे, स्वप्नील दुधाने, विजय खळदकर, लक्ष्मणराव बराटे, संभाजीराव बराटे, पोपट फेंगसे, हरिभाऊ बराटे, नामदेवराव शेडगे, परमेश्वर माने, पोपट बराटे, मारुती बाठे, शिवाजीराव फेंगसे, राजाभाऊ भालेकर, चेतन भालेकर विजय फेंगसे, विठ्ठल बराटे, संतोष वाघमारे, बबनराव माने, नरसिंग चौगुले, संजय साळुंके, दिनेश बराटे, किशोर कांबळे, नंदकुमार घाटे, अजय भुवड, श्रीरंग विटकर, दत्ता माने, चंद्रकांत सितापराव, संतोष पवार, उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने चंद्रकांत मोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्वेनगर परिवर्तन आघाडीच्या वतीनेही मोकाटे यांना पाठिंबा देण्यात आला.
कांता बराटे म्हणाले, मोकाटे जीवभावाचे आणि आपल्या घरातील आहेत. कर्वेनगर च्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना आपण कधीही भेटू शकतो आणि कामे करून घेऊ शकतो. सहज उपलब्ध होणारा आणि हक्काचा माणूस समोरचा उमेदवार हा बाहेरचा आहे. त्यांना जा फोन करू शकतो ना लगेच भेटू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे चंद्रकांत मोकाटे यांना निवडून द्यायचे आहे. म्हणूनच ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

बाळासाहेब बराटे म्हणाले, ही निवडणूक नक्की कशाची आहे हे सर्वांनी गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. विकासाचे मुद्दे सोडून वेगळ्या विषयावर निवडणूक नेली जात आहे. माझी आणि चंद्रकांत मोकाटे यांची ओळख संघाच्या शाखेतच झाली. खर हिंदुत्व काय आहे हे त्यांना माहीत आहे. आज कर्वेनगरचे अनेक प्रश्न. शासन दरबारी प्रलंबित आहेत. आताच्या आमदारांना याबाबत पत्र दिली पण त्यांच्याकडूनच कसलाच प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्वेनगर चे शासन दरबारी प्रलंबित असणारे प्रश्न सोडवायचे असतील तर चंद्रकांत मोकाटे यांना विधानसभेत पाठवावे लागेल. त्यामुळे मतदारसंघांमध्ये आपले मित्र परिवार,.नातेवाईक असतील त्या सर्वांना आपण फोन केले पाहिजे किमान प्रत्येकाने शंभर फोन केले पाहिजेत. मोकाटे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी आपल्या जवळच्या लोकांना संपर्क करावा.



कुमार बराटे म्हणाले, चंद्रकांत मोकाटे म्हणजे मदतीला धावून येणारा माणूस, धन शक्ती विरुध्द कार्यशक्ती अशी आजची निवडणुकीतील लढत आहे. आपली ताकद दाखवायची वेळ आली आहे. आपला हक्काचा माणूस निवडून आणायचाय त्यामुळे फक्त मशाल चिन्ह लक्षात ठेवायच आहे. काल आमचा ग्रामस्थांचे मोकाटे यांना पाठिंबा द्यायचे ठरले आणि त्याला सर्वांनी एकमताने होकार दिला. आज एवढया मोठया संख्येने सर्वजण उपस्थित राहिले. सर्वांनी मोकाटे यांना जास्तीत जास्त मते देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
स्वप्नील दुधाने म्हणाले, गेल्या काही महिन्यात एक वेगळी विघातक संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न कोथरूड मतदार संघात केला जात असून सर्वांनी ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. विकास कामे सोडून लोकांना केवळ आमिषे दाखवण्याचे काम केले जात आहे. ही निवडणूक पक्षाची नाही तर ही निवडणूक तुमची आमची आहे. आपण आता जर बदल केला नाही किंवा आता जर निवडणूक आपण हातात नाही घेतली तर ते लोकांना गुलाम बनवल्याशिवाय राहणारा नाहीत. चंद्रकांत मोकाटे यांच्या रूपाने आपल्याकडे सक्षम आणि मतदार संघाची खडानखडा माहिती असलेला हक्काचा उमेदवार मिळाला आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे.
चंद्रकांत मोकाटे म्हणाले, ही संघर्षाची लढाई आहे. आपण कोथरूड कर्वेनगर मध्ये सत्तेत नसतानाही आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करून अनेक महत्वाची मोठी कामे करून घेतली. पण आज जे कोथरूड मध्ये सुरू आहे त्याला काय म्हणावे हे कळत नाही. त्यांनी जो प्रकार सुरू केला आहे त्याचा त्रास नागरिकांनाच होतोय हे त्यांना कसं कळत नाही. कोथरूड मतदार संघातील जनता स्वाभिमानी आहे आणि ती जरूर योग्य उत्तर देईल. पैसा फेको तमाशा देखो अशी अवस्था केलेली आहे. आपल्याला गांभीर्याने निवडणूक घ्यावी लागेल. तुम्ही आता माझ्या पाठीशी उभा रहा मी कायम तुमच्यासाठी असेल. विकास काम तर सोडाच आपल्या सुख दुःखात ही माणसे कधी दिसली नाहीत. मला लढायची माहिती आहे आणि ही कुस्ती आपण चितपट करणार आहे. वेळ प्रसंगी माझ्या कानाला पकडुनही तुम्ही कामे करून घेऊ शकता कारण तुमचा तेवढा अधिकार असणारा आहे.
यावेळी विकास पासलकर, विजय खळदकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केल मेळाव्याचे आयोजन आयोजन कांता बराटे, बंडा बराटे, कुमार बराटे, बाळासाहेब बराटे, हिंदुराव पाटील, सुनील तोडकर, किरण बराटे, विजय खळदकर, नंदकुमार घाटे, स्वप्निल दुधाने, प्राची ताई दुधाने वैशाली दिघे यांनी केले होते. सूत्रसंचलन बंडा बराटे यांनी केले.






