“लोकसभा निवडणूक २०२४” च्या नियोजनासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक संपन्न.

पुणे : “लोकसभा निवडणूक २०२४” साठी पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणूक नियोजन बाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न झाली.
यावेळी पुणे,बारामती,शिरूर या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ४०० खासदार निवडून आणून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावयाचे आहे असे आवाहन करत “अबकी बार ४०० पार” असा नारा सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला. पुणे जिल्ह्यातील या तीनही लोकसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे’ योगदान सर्वाधिक असणार आहे.
सदर बैठकीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आजी माजी नगरसेवक, विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला, युवक, युवती, विद्यार्थी,अल्पसंख्याक, सामाजिक न्याय सह सर्व सेलचे पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी आदी उपस्थित होते.






