पुणे शहर

पुणेकरांना उमेदवाराकडून हवंय ‘हे’ अजब प्रॉमिस, बॅनर लावून मागितले प्रॉमिस

पुणे : पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मी आहे तोपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होऊ देणार नाही, असं म्हणत वसंत मोरेदेखील कोणत्या पक्षाने उमेदवारी दिली तर त्या पक्षाकडून नाही तर अपक्ष या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत.

तिन्ही उमेदवार पुण्याचं वेगळं चित्र नागरिकांना दाखवत आहेत. शाश्वत विकास, स्मार्ट सीटी आणि अनेक महत्वाचे प्रश्न घेऊन प्रचाराला लागले आहे. प्रत्येकाच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. मात्र यातच पुणेकरांना फक्त पक्ष न बदलणारा नेता हवा असल्याचं या पुणेरी पाटीच्या माध्यमातून पुणेकरांनी सांगितलं आहे.

बॅनरवर नक्की काय लिहिलंय?
‘मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी 5 वर्ष प्रामाणिक राहीन, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तीला निवडून देऊ नका,” जो उमेदवार आपल्या परिचय पत्रात असे लिहिन त्यांनाच मतदान करा, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. शिवाय पुण्यातील अनेक ठिकाणी हे बॅनर्स पाहायला मिळत आहे. हे बॅनर नक्की कोणी लावले, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

Img 20240322 wa00017404573101520546217
Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये