पुणे शहर

नाशिक फाटा ते खेड इलिव्हेटेड हाय-वे : नितीन गडकरी


पुणे : राष्ट्रीय महामार्ग ६० वरील नाशिक फाटा ते खेड या ३० किमीच्या रस्त्यालगत नागरीकरण वाढल्यामुळे तसेच याच परिसरात असलेल्या चाकण ‘एमआयडीसी’मुळे या भागात मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता सदर भागात इलिव्हेटेड हाय-वे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामध्ये मेट्रोसाठीची तरतूदही करण्यात आली असून, यासंदर्भातील डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून अहवाल निश्चितीनंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर गडकरींनी काम सुरू असल्याचं सांगितलं. पुण्यातील सातारा रस्त्यावर होणारं ट्राफिक कमी करण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजना राबवणार असल्याचं गडकरी म्हणाले. “सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे”, असं गडकरी म्हणाले.

यावेळी बोलताना नितीन गडकरींनी पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्गाबाबत माहिती दिली. “पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्ग आम्ही उरसे नाक्यावरून सुरू करणार आहोत. त्यामुळे मुंबईकडून बंगळुरकडे जाणारी वाहतुक तिथूनच वळून जाईल. त्यामुळे मुंबई ते बंगळुर साडेचार तासांत आणि पुणे ते बंगळुर हा प्रवास साडेतीन किंवा सव्वातीन तासांत पूर्ण होईल. हा पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातून जाणारा रस्ता आहे. त्या भागाचा विकास होण्यासाठी या महामार्गाचा फायदा होईल”, असं गडकरी म्हणाले.

Img 20220804 wa0019951227047229036961

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये