पुणे युवक राष्ट्रवादीच्या गिरीश गुरनानींची शरद पवारांच्या समर्थनार्थ कोथरूडमध्ये बॅनरबाजी.

पुणे : महाराष्ट्रात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील राजकीय भूकंपाचे पडसाद अनेक ठीकानी पडताना दिसत आहेत. काही जण अजित पवारांच्या बाजूने तर काही जण शरद पवारांच्या बाजूने भूमिका घेताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील कोथरूड येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शरद पवारांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले.
कोथरूड राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले “अनेक वर्षांपासून समता, बंधुता, सर्वसमावेशकता या विचारांना धरून चालणाऱ्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस चे काम करत आहोत. शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारधारेला अनुसरून कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती आमच्या साठी वंदनीय आहे.

त्याचवेळी या विचारधारेच्या विरूद्ध काम करणाऱ्या लोकांसोबत खांद्याला खांदा लावून बसायची आमची तयारी नाही. आमचा विरोध कोणत्याही व्यक्ती विशेष ला नसून आमच्या विरोध राष्ट्रवादी च्या विचारधारे ला विरोध करणाऱ्यांना आहे. मागील काही दिवसात अत्यंत खालच्या पातळीच राजकारण महाराष्ट्रात होताना दिसत आहे. आम्हाला हे अत्यंत आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने सांगावेसे वाटत आहे की आम्ही शाहू, फुले व आंबेडकर यांचे दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत आहोत.”असेही गुरनानी म्हणाले.






