कोथरुड

कर्वेनगरमध्ये गौरी गणपती सजावट व सेल्फी विथ बाप्पा सपर्धेतील विजेत्यांवर कोजागिरीच्या सायंकाळी बक्षिसांचा पाऊस..

कर्वेनगर : pune city, karvenagar राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रविण दुधाने व तेजल मयुर दुधाने यांच्या वतीने  गणेशोत्सवा दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट व सेल्फी विथ बाप्पा सपर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ कर्वेनगर मधील दुधाने लॉन्स येथे कोजागिरीच्या सायंकाळी उत्साहात पार पडला. यावेळी सहभागी स्पर्धकांवर बक्षिसांचा पाऊस  पडला. या स्पर्धेतील गौरी सजावट स्पर्धेत तेजस चौधरी तर सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत जीवन मानकर व अश्विन जगताप यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, पोपट फेंगसे, नारायण शिंदे, पोपटराव बराटे, संजय भोर, निळकंठ शेळके, नारायण शिंदे, रोहिदास शिंदे, संजय कदम,  अनिल वाळींबे, अजय बरमदे, अमित ओवले, तानाजी शिंदे, रजनी पाचंगे, झरीना खान, मंगल भालेराव, कल्पना खेडेकर,  शामल डहाळ आदी उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी आपल्या परिवारासह बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती लावली.

यावेळी ह.भ.प माणिक दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष प्रवीण दुधाने, तेजल दुधाने यांच्यातर्फे स्थानिक नागरिकांसाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पाचशे लिटर मसाला दुधाचे तसेच पाव भाजी जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

Img 20211014 wa0004

स्पर्धेचा निकाल
सेल्फी विथ बाप्पा
प्रथम क्रमांक जीवन मानकर, अश्विन जगताप (कॉम्प्युटर),
द्वितीय क्रमांक अदिती मेंगडे (सायकल), तृतीय क्रमांक अंकिता लगड (स्कूल किट), चौथे बक्षीस सार्थक सुतार ( बॅट बॉल) तर  20 उत्तेजनार्थ विजेत्यांना ट्रॅक सुट बक्षीस देण्यात आले.
 

गौरी गणपती सजावट स्पर्धा
प्रथम क्रमांक तेजस चौधरी (स्मार्ट टीव्ही), द्वितीय क्रमांक अंजली मराठे (फ्रिज),तृतीय क्रमांक स्मिता कुलकर्णी( वॉशिंग मशीन), चतुर्थ क्रमांक आदिती बराटे( मायक्रो ओव्हन),पाचवा क्रमांक अश्विनी वांजळे(गॅस शेगडी)11 उत्तेजनार्थ विजेत्यांना फुड प्रोसेसर बक्षीस म्हणून देण्यात आले. बक्षीस मिळाल्यानंतर विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये