देशविदेश

उत्तराखंड नैनीतालमध्ये पावसाचा कहर ; महाराष्ट्रातील पर्यटक अडकले : पहा व्हिडिओ

उत्तराखंड नैनीतालमध्ये गेली २४ तास मुसळधार पाऊस पडतोय. सततच्या पावसामुळे रस्ते बंद असल्याने अनेक पर्यटक अडकून पडले असून नाशिकचे २७ पर्यटक ही नैनीतालमध्ये अडकले असल्याची माहिती मिळत आहे.

लष्कराचे जवान नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलावण्यासाठी प्रयत्न करत आहेत . मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नैनी तलावाच्या पाण्याच्या पातळीने मागील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मुसळधार पावसामुळे प्रभावित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण केले.  नंतर त्यांनी रुद्रप्रयाग गाठल्यानंतर नुकसानीच्या मूल्यांकनाचा आढावा घेतला. मंत्री धनसिंह रावत आणि राज्याचे डीजीपी अशोक कुमारही त्यांच्यासोबत होते.

Img 20211014 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये