राजकीय

राज ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार नाहीत : रामदास आठवले

मुंबई : राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी केले आहे. मशिदींवरचे अजानचे भोंगे हटवले नाहीत तर त्यांच्यापुढे मोठ्या आवाजात मंदिरांवर हनुमान चालिसा लावली जाईल, ही भूमिका योग्य नसल्याचे मतही त्यांनी मांडले आहे.

रामदास आठवले म्हणाले, कोणाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. काही मंदिरांवर लाऊडस्पीकर आहेत. त्यामुळे मशिदीवर जे त्यांचे परंपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायत म्हणून आम्ही लावू अशी भूमिका घेणं योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत, तिथे आहेत, मंदिरांवरही लाऊडस्पीकर असल्याचं आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नाहीत, याचा आम्हाला खेद आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये