राजकीय

त्या सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांच्या निडर लढ्याबाबत अभिनंदनच ट्विट करावं ; भाजपाने आधीसारखा त्यांना मसुदा द्यावा

मुंबई : शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सरकारवर टीकेची झोड उठली असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे कौतुक होत आहे. आंदोलनादरम्यान ट्विट करून सल्ला देणारे सेलिब्रिटीही आता निशाण्यावर असल्याचे दिसत आहे.

शेतकरी आंदोलना दरम्यान ट्विटरच्या माध्यमातून सल्ला देणाऱ्या सेलिब्रिटींकडून आता आपण शेतकऱ्यांच्या न्यायासाठीच्या निडर लढ्याबद्दल अभिनंदनाच्या ट्विटची अपेक्षा करुया का? असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे ट्विट करत सावंत यांनी सेलिब्रिटींच्या त्यावेळी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सावंत यांनी म्हंटले आहे.  आता सेलिब्रेटींच्या इच्छेनुसार “AMICABLE” म्हणजे सौहार्दपूर्ण उपाय मिळाल्याने, शेतकऱ्यांच्या न्यायासाठीच्या निडर लढ्याबद्दल अभिनंदनाच्या ट्विटची अपेक्षा करुया का? भाजपा पदाधिकाऱ्याला टॅग केले वा ट्विट शब्दशः जुळल्यासही हरकत नाही. भाजपाने आधीसारखा त्यांना मसुदा द्यावा ही विनंती. अशी उपरोधिक टीका त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

Img 20211105 wa0169

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये