सांस्कृतिक
सुंदर गोविंद वाणी मित्र मंडळातर्फे आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

नाशिक : सुंदर गोविंद वाणी मित्र मंडळातर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला. 30 कुटुंबांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.

वैविध्यपूर्ण कल्पनेने साकारलेले तसेच आकर्षक आरास व पर्यावरणास समर्पित करणारे देखावे थक्क करणारे होते.
गणेश भक्तांचा उत्साह व गणेशाप्रति अपार श्रद्धा यातुन दिसुन आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.



स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-
- प्रथम क्रमांक
प्रदिप पी.तलवारे गोविंद नगर.
2. द्वितीय क्रमांक
मधुकर गोविंद वाणी उंटवाडी.
3. तृतीय क्रमांक
श्री हर्षल नकुल येवला ईच्छामणी कॉलनी.खोडे मळा.
4. चतुर्थ क्रमांक
श्री योगेश जगन्नाथ फुलदेवरे रामल्या सृष्टी, कर्मयोगी नगर.
5.पाचवा क्रमांक
अनंत मधुकर धामणे गोविंद नगर.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष निंबा अमृतकर, उपाध्यक्ष शांताराम भदान, सचिव संदीप देव, खजिनदार रवींद्र सोनजे, पाटकर तात्या, सचिन राणे यांनी अथक परिश्रम घेतले.


