पुणे शहर

सेवानिवृत्त एम.ई.सी.बी अभियंता एकनाथराव लाटे यांचा अभीष्टचिंतन सोहळा संपन्न

औरंगाबाद : औरंगाबाद येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे सेवानिवृत्त एमईसीबी अभियंता ह. भ. प. एकनाथराव लाटे अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला. या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ह. भ. प. प. पू. भरत महाराज चौधरी यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आळंदीचे प. पू. ह. भ. प. गुरुवर्य नरहरी महाराज चौधरी यांच्या हस्ते एकनाथराव रामकिसन लाटे यांचा अभिष्टचिंतनात्मक अमृत महोत्सवी पूजन व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विठ्ठल रूक्मिणी मंदीर देवस्थान, पंढरपूरचे सदस्य अँड. माधवी निगडे, आळंदी मंदीरचे विश्वस्त राजा भाऊ चोपदार, दौलताबाद येथील देवगिरी चॅरीटेबल ट्रस्टचे विश्वस्त परमेश्वर महाराज कोरडे , एस.डी.जाधव उपस्थित होते. याशिवाय कार्यक्रमासाठी परिसरातील सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित होते.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये