राजकीय

पंकजा मुंडे-अमित शाह भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. ही भेट नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असते, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं.

भाजपच्या बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर गृहमंत्र्यांशी चर्चा केली. या भेटीचं ट्विट त्यांनी केलं. ‘आमचे नेते, देशाचे प्रभावी गृहमंत्री आणि सहकार क्षेत्राला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाणारे अमितभाई शहा यांची भेट नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असते’, असं मुंडेंनी म्हटलंय. 

Img 20220428 wa0008 1
Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये