सचिन फोलाने यांची भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सचिन फोलाने यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी ही नियुक्ती केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फोलाने यांची निवड करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात म्हंटण्यात आले आहे.

सचिन फोलाने यांनी प्रभाग अध्यक्ष, विधानसभा सरचिटणीस, ते भाजयुमो पुणे शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाकडून आता त्यांच्यावर भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर सूचनेनुसार भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून काम करताना पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागळातील सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे फोलाने यांनी निवडीनंतर सांगितले.









