राजमाता जिजाऊंना अनोख्या उपक्रमातून अभिवादन..नवजात मुलींचे स्वागत तर त्यांच्या मातांचा सन्मान

पुणे : राजमाता जिजाऊ मॉं साहेबांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच जन्मलेल्या मुलींचे स्वागत व त्यांच्या मातांचा सन्मान पुणे शहर शिवसंग्राम संघटनेच्या वतीने करण्यात आला. शहरातील महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मतांचा व मुलींचा सन्मान सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्यामुळे मुलींना जन्म देणाऱ्या माताही भारावून गेल्या.
स्व.आ. विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत जिजाऊ जयंती निमित्त जन्मलेल्या मुलींचे स्वागत व त्यांच्या मातांचा सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम पुणे शहर शिवसंग्राम संघटनेच्या वतीने घेण्यात आला.
या प्रसंगी पुणे शहर अध्यक्ष- श्री.भरत लगड, पुणे शहर महिला अध्यक्षा सौ कालिंदीताई गोडांबे, सामाजिक न्याय पुणे शहर अध्यक्ष- श्री.विनोद शिंदे, सामाजिक न्याय पुणे शहर महिला उपाध्यक्षा – सौ.कल्पनाताई शिंदे, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष-श्री.भरत फाटक, पुणे शहर युवा नेते श्री.चेतन भालेकर, खडकवासला मतदारसंघ महिला अध्यक्षां- सौ.हेमाताई पायगुडे, सौ.सुजाताताई ढमाले सरचिटणीस पुणे शहर महिला, व ईतर पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.










या उपक्रमाबाबत बोलताना भरत लगड म्हणाले, स्व.आ. विनायकराव मेटे यांनी मुलींचा जन्मदर वाढावा याकरीता “अजित बालिका” योजना सुरू केली. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी त्यांनी समाजाचे प्रबोधन केले त्यासाठी सामाजिक कार्यक्रम घेतले. स्वर्गीय मेटे साहेबांनी त्यांच्या हयातीत सुरू केलेले सामाजिक कार्य अविरतपणे सुरू ठेवण्याच्या हेतूने आजचा उपक्रम राबवण्यात आला.






