पुणे शहर

पुणे लोकसभा उमेदवारी वरून संजय काकडेंची उघड नाराजी, मंत्री रविंद्र चव्हाणांची भेट

पुणे : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. काकडे यांनी थेट फेसबूकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीसाठी जे इच्छुक होते त्यातील एक, माजी खासदार संजय काकडे यांनी आज पक्षाने दिलेल्या उमेदवाराबाबत पुण्यात,एकूणच नागरिकात काय वास्तव परिस्थिती आहे याबाबतची माहिती राज्यातील मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्याची माहिती आहे.

दरम्यान याबाबत सोशल मिडीयावर एक पोस्ट हि काकडे यांनी केली आहे. या मध्ये त्यांनी असे म्हटले आहे कि

,’राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माझे मित्र श्री रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली.यावेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तराने सांगितले. तसेच, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली. मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक व केंद्रीय गृहमंत्री आदरणीय श्री अमितभाई शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटी दरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे.

Img 20240322 wa00017404573101520546217
Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00026664518766032457834

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये