पुणे शहर

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर कलम 144 लागू , पर्यटनासाठी बाहेर पडाल तर कारवाई होणारच!

पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर आजपासून कलम 144, पर्यटनासाठी बाहेर पडले तर कारवाई होणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर आजपासून 144 कलम लावण्यात आलेले आहे. बेशिस्त नागरिकांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांची मोहीम सुरु झालीय. विकेंड लॉकडाऊन असूनही पर्यटन स्थळी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे लक्षात येताच आज पासून पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर 144 कलम लावण्यात आले आहे.(Section 144 applies to all tourist places in Pune district, if you go out for tourism, action will be taken!)

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर 144 कलम
ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी विकेंड लॉकडाऊन सुरु आहे. परंतु नागरिकांना याचं कसलंही भान राहिलं नाहीय. लॉकडाऊन असून देखील नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अशात शासन आणि प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात यावी म्हणून विविध प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर आजपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे.

Img 20210707 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये