पुणे शहर

पुणे शहरात महापालिका आयुक्तांकडून नवीन निर्बंध लागू ; दुकानाच्या वेळा बदलल्या तर सायंकाळी ५ नंतर संचारबंदी

पुणे : पुणे शहरातील कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी पुणे महापालिका आयुक्तांनी नवीन आदेश जारी करण्यात आले असून यात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. नवीन  आदेशानुसार दुकानांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सोमवार दिनांक २८ जून पासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. New restrictions imposed by Municipal Commissioner in Pune city;  Shop times changed

ज्याअर्थी राज्य शासनाने दि २५.०६.२०२१ रोजी
पारित केलेल्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत लेव्हल -३ चे निर्बंध लागू राहतील.

कारोना प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
१) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा (Essential Category ) मधील नमूद दुकाने ही
आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
२) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने ( Non-Essential Shops ) सोमवार ते शुक्रवार दुपारी
०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
३) मॉल, सिनेमागृह ( Single Screen and Multiplex ) नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.
४) रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने
सुरु राहतील. दुपारी ४.०० नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा (Home
Delivery ) रात्री ११.०० पर्यंत सुरु राहील.

Img 20210522 wa0207

५) लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी , शासकीय
कर्मचारी, विमानतळ सेवा ( Airport Services ), बंदरे सेवा ( Port Services ) यांच्या कर्मचाऱ्यांना
प्रवास करणेस परवानगी राहील.
६) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग
आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०५.०० ते सकाळी ०९.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
७) सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना | सेवा (Exemption Category ) व्यतिरिक्त सर्व खाजगी
कार्यालये कामाचे दिवशी ( working days ) ५०% कर्मचारी क्षमतेने दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु
राहतील.

८) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-१९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय
कार्यालये ( Government Offices and Emergency Services required for Covid-19
Management ) १००% क्षमतेने सुरु राहतील.
शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त)
५०% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये | आस्थापना यांना यापेक्षा
जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.

९) सर्व आउटडोअर स्पोर्ट्स (outdoor games ) सर्व दिवस सकाळी ०५.०० ते ०९.०० या वेळेत सुरु
राहतील.
१०) सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार
दुपारी ०४.०० वाजपर्यंत परवानगी राहील.
→ उपरोक्त कार्यक्रमाचा कालावधी हा ३ तासांपेक्षा जास्त असू नये
– सदर ठिकाणी खाद्यपदार्थचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

११) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सदर ठिकाणी
दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील,
१२) लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. मे. शासनाने
निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी विवाह संबंधित कार्यक्रम
मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.
१३) अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत
करणेस परवानगी राहील. मे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार
धार्मिक स्थळी अंत्यविधीशी संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी
राहील.

१४) पुणे महानगरपलिका क्षेत्रामधील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे
बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी ०४.००
वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी ०४.०० वाजता तेथून
घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.

१५) पुणे महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास
( जमावबंदी) प्रतिबंध राहील तसेच सायंकाळी ०५.०० नंतर ( अत्यावश्यक कारण वगळता )
संचारबंदी लागू राहील.
१६) व्यायामशाळा (Gym ), सलून, ब्युटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या ५०% अमतेने
पूर्व नियोजित वेळेनुसार ( by appointment ) दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र शनिवार
व रविवार पूर्णतः बंद राहतील. सदर ठिकाणी वातानुकूल (A.C ) सुविधा वापरता येणार नाही.
4.००PAA

१७) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजिक वाहतूक व्यवस्था ( PMPML) आसन क्षमतेच्या ५०%
क्षमतेने (without standing) सुरु राहील.
१८) खाजगी वाहनातून, बसेस तसेच लाब अंतराच्या रेल्वे मधून अंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी
राहील. मात्र सदर वाहने शासनाने घोषित केलेल्या लेवल ५ मधिल ठिकाणी थांबणार असतील तर
e-pass असणे बंधनकारक राहील. अशावेळी वाहनामधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र
e-pass आवश्यक राहील,

१९) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे
नियमित वर्ग दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण
संस्था पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील, मात्र कोविड-१९ चे व्यवस्थापनाकरिता वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत Skill Development प्रशिक्षण
कोर्सेस सुरु राहतील. त्यांनी Covid Appropriate Behaviour (CAB ) चे पालन करावे.
२७) मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार
Home Delivery सुविधा सुरु राहील,

कर्वेनगरमध्ये वाचन चळवळीला प्रारंभ

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये