महाराष्ट्रराजकीय

शिवसेना दसरा मेळावा: जेवणाचे डबे आणि बॅगा आणू नका, पिकअप-ड्रॉपची सोय; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून खास सुविधा

दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांची तोफ धडाडणार आहे. शिवाजी पार्क मध्ये ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग आला असून आता तयारी अंतिम टप्प्यात आहे. जेवणाचे डबे आणि बॅगा आणू नका, असं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. त्याशिवाय शिवसैनिकांसाठी पिकअप-ड्रॉपची सोय करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून खास सोय करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर येणाऱ्या हजारो शिवसैनिकांसाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. नियोजनाची जबाबदारी ठाकरे गटाचे राज्यातील संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख यांना देण्यात आली आहे.

अधिकाधिक शिवसैनिकांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेने दसरा मेळाव्याला येण्याचं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.राज्यभरातील तळागाळातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना शिवतीर्थापर्यंत आणण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यातील संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे.

Img 20231023 wa0002281291760857229652946826

धाराशिव ते दादर या तुळजाभवानी विशेष एक्सप्रेस रेल्वे शिवसैनिकांना घेऊन दादरला येईल, त्यासोबतच कोल्हापूर आणि कोकणातून सुद्धा मोठ्या संख्येने रेल्वेने शिवसैनिक दसऱ्याला सकाळी मुंबईत पोहोचतील.

शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसैनिक आणि इतर मान्यवरांना शिवाजी पार्क येथे जाण्यास सोयीचे व्हावे, याकरिता स्थानिक पोलीस आणि वाहतूक यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या पोलिसांना वाहतुकीचे आणि गर्दीचे योग्य नियंत्रण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Img 20230717 wa0012281293529283828163631407

जेवणाचे डबे आणि बॅगा घेऊन येऊ नका, असं आवाहन शिवसैनिकांना करण्यात आलं आहे. मेळाव्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांकडून महत्त्वाचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार मेळाव्याला येताना जेवणाचे डबे, बॅगा अथवा कोणतीही वस्तू घेऊन मैदानात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे.

ठाकरे गटाकडून पार्किंग पासून ते शिवतीर्थ यासाठी विशेष पिकअप आणि ड्रॉपची सोय करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहन उभी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे

Img 20230511 wa0002282293142767040474980887

वाहने उभी करण्याची व्यवस्था खालीलप्रमाणे
बसेस, टेम्पो, ट्रॅव्हलर्स, मोठे टेम्पो
संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर
कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग, माहीम कॉजवे ते माहीम जंक्शन
पाच गार्डन, माटुंगा
एडनवाला रोड, , माटुंगा
नाथालाल पारेख, माटुंगा
आर. ए. के. रोड, वडाळा

चारचाकी हलकी वाहने
इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, दादर
इंडिया बुल्स 1 सेंटर, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एलफिन्स्टन, सेनापती बापट मार्ग, दादर
कोहिनूर वाहनतळ, जे. के. सावंत मार्ग, शिवाजी पार्क

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये