कोथरुड

कोथरूड मध्ये शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखा उद्घाटनाचा धडाका सुरूच…

कोथरूड : कोथरूड मधील विविध भागात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाचा धडाका जोरात सुरू असून यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. शिवसैनिक जयदीप पडवळ यांच्या माध्यमातून या शिवसेनेच्या शाखा सुरू करण्यात आल्या असून आतापर्यंत पाच नव्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

या शाखांचे उद्घाटन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते करण्यात आले असून सलग होत असलेल्या शाखा उद्घटनांच्या माध्यमातून कोथरूडचं वातावरण भगवेमय झाले आहे. उत्साहपूर्ण वातावरणात ढोल ताशांच्या गजरात या शाखांची उद्घाटने पार पडत आहेत. पाच शाखांची उद्घाटने पार पडली असून यापुढे ही असाच शाखा उद्घाटनचा झंझावात सुरू राहणार असल्याचे जयदीप पडवळ यांनी सांगितले.

नुकताच राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) व मोरे विद्यालय या दोन शाखांचे उद्घाटन शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. या आगोदर पालवी हॉटेल, रामबाग कॉलनी, पौड रोड शाखेचे उद्घघाटक शिवसेना उपनेत्या सूषमा अंधारे यांच्या हस्ते, कर्वे पुतळा चौकातील शाखेचे उद्घघाटक शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या हस्ते, किनारा चौक शाखा उद्घघाटक आदित्य शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कोथरूड मध्ये सुरू झालेल्या या पाच शाखांच्या माध्यमातून नवे कार्यकर्ते उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळाले असून अनेक जणांनी पक्षात प्रवेश केला आहे. कोथरूडला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जात होते. परंतु मागील काही वर्षांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर भाजपचे प्रस्थ कोथरूड मध्ये वाढले, मात्र त्यातही आम्ही कुठे मागे नाही आणि कोथरूड हा शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार हेच या जयदीप पडवळ यांनी सुरू केलेल्या नव्या शाखा उद्घाटन कार्यक्रमातून दाखवून दिले जात आहे.

Img 20230413 wa0040
पालवी हॉटेल, रामबाग कॉलनी, पौड रोड शाखेचे उद्घघाटक शिवसेना उपनेत्या सूषमा अंधारे यांच्या हस्ते
Img 20230413 wa0039
कर्वे पुतळा चौकातील शाखेचे उद्घघाटक शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या हस्ते
Img 20230415 080107
मोरे विद्यालय शाखा उद्घघाटक सचिन अहिर यांच्या हस्ते
Img 20230413 wa0042
राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) शाखा उद्घघाटक सचिन अहिर यांच्या हस्ते
Img 20230413 wa0041
किनारा चौक शाखा. उद्घघाटक आदित्य शिरोडकर यांच्या हस्ते
Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये