ताण-तणाव दुर करायचा असेल तर याशिवाय पर्याय नाही ; व्याख्याते श्याम भुर्के यांनी सांगितला तणावमुक्तीचा मार्ग..

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानमाला व ग्रंथोत्सवाचे आयोजन..
पुणे : pune city भौतिक सुखाच्या मागे धावताना मनुष्यप्राण्याने अतिरिक्त आणि उगाचचे ताण ओढवून घेतले आहेत. ह्या ताणाच्या चक्रव्यूहातून सुटाचे असल्यास त्याला विनोद बुद्धि शिवाय पर्याय नाही, असे मत व्याख्याते श्याम भुर्के यांनी व्यक्त केले.
ओंकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिनांक १२ ते १६ डिसेंबर दरम्यान वारजे जकात नाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजीत भव्य ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेत ‘मराठी साहित्यातील विनोदी परंपरा’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते श्याम भुर्के यांचे व्य़ाख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या दुस-या पुषुष्पाचे अध्यक्ष संजय बराटे, व्याख्यानमाला व ग्रंथोत्सवाचे संयोजक पुणे महानगर पालिकेच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने आणि साहित्यीक वि.दा.पिंगळे उपस्थित होते.
व्याख्याते श्याम भुर्के म्हणाले, संसाराच्या पटला पासून ते व्यवसाईक पटलापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आज आपणास ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. या वाटचालीत विनोद पेरला गेला नाही तर जगणे कठिण होईल. विनोद हाच त्यावर रामबाण ठरु शकेल. दुःख प्रत्येक टप्प्यावर आहे, पंरतू त्या दुःखाला मनाच्या घरात घर करु द्यायला नको. त्या दुःखापासून मुक्ती मिळविण्यासाठी भक्तिमार्ग किंवा विनोद हेच दोन राजमार्ग आहेत.

ते म्हणाले, मराठी साहित्यात विनोदाची दीर्घ परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण कोल्टकरांच्या सुदाम्याचे पोहे पासून सुरु होणारी ही परंपरा चि.वी.जोशी, राम गणेश गडकरी, पु.ल.देशपांडे आणि प्र.के.अत्रे यांच्या पर्यंत येऊन ठेपते. या साहित्यिकांनी साहित्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात विनोद पेरला आणि प्र.के.अत्रे यांच्या पर्यंत येऊन ठेपते. या साहित्यिकांनी साहित्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात विनोद पेरला आणि कठीणातील कठीण काळात विनोद बुद्धि कशी जागृत ठेवायची याचे धडेच दिले आहेत.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी प्रास्ताविक केले. साहित्यीक वि.दा.पिंगळे यांनी देखील यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.पुणे महानगर पालिकेच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी भव्य ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमाला आयोजनामागची भुमिका विषद केली.






