आंतरराष्ट्रीय

भारताच्या दानिश सिद्दिकींना ‘फोटोग्राफीचा नोबेल’

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये कर्तव्य बजावताना प्राण गमावलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. फिचर फोटोग्राफी विभागामध्ये दानिश यांना यंदाचा ‘पुलित्झर पुरस्कार 2022’ प्रदान केला जाणार आहे. दानिश यांच्यासहीत चार भारतीयांना हा बहुमान यंदा हा बहुमान देण्यात येणार आहे. ‘पुलित्झर पुरस्कार’ हा फोटोग्राफीमधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. दानिश यांच्या कामाचा या पुरस्काराच्या माध्यमातून मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे.

दानिश यांचे रॉयटर्स वृत्तसंस्थेमधील सहकारी अदनान अबिदी, साना इशरद माटो आणि अमित दवे यांनाही या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. भारतामधील करोना मृतांची दाहकता दाखवणारी छायाचित्रे त्यांनी निर्भीडपणे टिपली होती.

नवी दिल्लीमधील एका स्मशानभूमीमध्ये 22 एप्रिल 2021 रोजी एकाच वेळी अनेक करोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचा फोटो दानिश यांनी काढला होता. या फोटोमध्ये स्मशानभूमीच्या भिंतींच्या सीमा या लोकवस्तीला लागून असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. करोनाची दाहकता दर्शवणारा फोटो म्हणून हा फोटो तेव्हा चांगलाच चर्चेत आलेला. रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी त्यांनी हा फोटो काढलेला. हा फोटो अंगावर काटा आणणारा आहे असं अनेकांनी हा फोटो पाहता त्याक्षणी म्हटलं होतं.

रोहिंग्या निर्वासितांवरील छायांकनाबाबत 38 वर्षीय दानिश यांना पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. . हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय होते. त्यांचे शिक्षण जामिया मिलिया इस्लामियात झाले होते. तेथे त्यांचे वडील प्राध्यापक होते. दानिश यांचे वडील प्रा. अख्तर सिद्दिकी आणि आई शाहिदा यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी सध्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात (International criminal court) तालिबानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अफगाणिस्तानात 16 जुलै 2021 रोजी स्पिन बोल्दाक भागात रॉयटरसाठी काम करीत असताना दानिश यांच्यावर हल्ला झाला होता. तालिबानने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा छळ केला होता.  

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये