अर्थजगत
पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी मागील 12 दिवसांत 10 वेळा इंधन दरवाढ केली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी एक दिवस विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा दणका दिला आहे. आज शनिवारी गुढी पाडव्याला देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 80 पैशांनी महागले. या दरवाढीने नजीकच्या काळात महागाईचा भडका उडणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.
मागील 12 दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 7 रुपये 20 पैशांनी महागले आहे. मुंबईत आज शनिवारी पेट्रोल 85 पैशांनी महागले आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 117.57 रुपये झाला आहे.














































