कोथरुड

आठ दिवसात पाणीप्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन : हर्षवर्धन मानकर यांचा प्रशासनाला इशारा..

कोथरूड : कोथरुड भागात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. प्रभागा क्रमांक ११ मधील सिग्मावन सोसायटी, व किष्किंधानगर मधील चाळ विभागात तसेच वसंतनगर येथील वस्ती विभागात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील पाणी प्रश्न आठ दिवसात सोडवण्यात आला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी दिला आहे

या संदर्भातील निवेदन हर्षवर्धन मानकर यांच्याकडून
मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे देण्यात आले आहे. पावसकर यांची भेट घेऊन वरील भागात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी हर्षवर्धन मानकर यांनी पाणी प्रश्न सुटला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा पावसकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.    

सिग्मावन सोसायटी, किष्किंधानगर मधील चाळ विभाग, वसंतनगर येथील वस्ती भागात सध्या पाण्याचा प्रश्न जाणवत आहे. या भागात कमी दाबाने पाणी येत आहे तर  किष्किंधानगर मध्ये केवळ पंधरा मिनिटे पाणी येतं आहे. पुरेशा दाबाने पाणी देऊन वेळ ही वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. सिग्मावन सोसायटी मध्ये महीन्याचा टँकर खर्च पन्नास साठ हजार रुपये होतोय. टँकरने पाणी घ्यायला आपण काय खेड्यात राहत नाही अशा शब्दात नगरसेवक दीपक मानकर यांनी प्रशासनाला सुनावले आहे.

या बैठकीला मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, हर्षवर्धन मानकर. अधिक्षक अभियंता प्रसन्न राघव जोशी. दिलीप कानडे उपस्थित होते. आठ दिवसात भागात फरक दिसून येईल.  वैयक्तिक लक्ष घालून येथील पाणी प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन पावसकर यांनी यावेळी बैठकीत दिले आहे.

मुळशीतील रिहे गावात रंगली मुली विरुद्ध मुलाची अनोखी दंगल ; कडव्या झुंजीत कोण झालं विजेता पहा व्हिडिओ
Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये