पुणे शहर

पुण्यात एसटी बसची वाहनांना धडक,फातिमानगरमध्ये भरधाव एसटीची दोन कारसह पाच दुचाकींना धडक

पुणे : पुण्यात फातीमानगर भागात भीषण अपघात घडला आहे. एसटी बसने सात वाहनांना उडवले असून अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. भरधाव एसटीने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली आहे. पोलिसांनी एसटी बसचालकला ताब्यात घेतले आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एसटी बस सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात मोटारीतील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, अन्य सहा जण किरकोळ जखमी झालेत. पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) याला ताब्यात घेतलं आहे.

5e0d0017 093c 4d88 b894 98fe125dd5c45294629342453342350

पुण्यातील हडपसर रस्त्यावर कायमच  वर्दळ असत. या मार्गावर कायम वाहतूक कोंडी असते. दरम्यान, मंगळवारी रात्री या मार्गावर रामटेकडी येथे मोठा अपघात झाला. सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून रात्री फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात अपघात झाला  बसमध्ये अपघाताच्या वेळी 30 प्रवासी होते.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

दरम्यान,ब्रेक न लागल्याने बसने चार ते पाच वाहनांना धडक दिली. यात काही कारचा चक्काचूर झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तर चार ते पाच नागरीक जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये