राष्ट्रीय
श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू
पाटणा : बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यात सिद्धेश्वरनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. श्रावणी सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होती. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना मखदुमपूर आणि जेहानाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जेहानाबादचे जिल्हा दंडाधिकारी अलंकृत पांडे आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. दंडाधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.